पाणी गळतीने हजारो लिटर पाणी वाया! नगरपालिका प्रशासन झोपेत?

अमळनेर येथील जीवनतारा हॉस्पिटलजवळ मुख्य पाईपलाइन फुटली, नागरिक संतप्त
आबिद शेख/अमळनेर
शहरातील जीवनतारा हॉस्पिटलजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
शहरात आधीच पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी होणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे मोठे उदाहरण आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून 100% नळपट्टी वसूल केली जाते, मात्र पाईपलाइन देखभालीसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात नाहीत.
नागरिकांच्या मते, शहरात वारंवार पाईप फुटण्याच्या घटना घडत असूनही पालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. जर ही गळती त्वरित दुरुस्त झाली नाही, तर नागरिक आंदोलन करतील उन्हाळा अद्याप पूर्ण ताकदीने सुरू व्हायचा आहे, त्यामुळे प्रशासनाने जागे होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.