अमळनेरमध्ये मोठ्या स्क्रीनवर भारत-विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना!

आबिद शेख/अमळनेर
अमळनेरकरांसाठी क्रिकेटप्रेमींसाठी मोठी संधी! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांचा अंतिम सामना आता मोठ्या डिजिटल स्क्रीनवर पाहण्याची संधी मिळणार आहे.
निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार लॉनवर, क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आले आहे. ढोल-ताशांच्या गजरात हा सामना पाहण्याची मजा काही औरच असणार आहे.
🔹 वेळ: दुपारी 2 वाजेपासून
🔹 स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, न्यू प्लॉट, अमळनेर
आयोजक:
➡️ श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, अमळनेर
अनमोल सहकार्य:
➡️ श्री गोविंदशेठ अग्रवाल (मोहन कृषी उद्योग, अमळनेर)
➡️ अंबिका स्टुडिओ, अमळनेर
सारे एकत्र येऊन क्रिकेटचा रोमांच अनुभवूया!