पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे महिला दिन उत्साहात साजरा

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – वत्साई एज्युकेशन सोसायटी संचालित पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिला दिनाच्या औचित्याने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता, रमाबाई आंबेडकर यांच्या वेशभूषेत सादरीकरण करून महिलांच्या योगदानाला उजाळा दिला.
कार्यक्रमात प्रज्ञा पाटील मॅडम यांनी महिलांच्या सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय योगदानावर प्रकाश टाकत महिला सरपंचापासून राष्ट्रपतींपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुंजल पाटील, मयुरी चौधरी, उष्कर्षा लोकंक्षी, विजय चौधरी, सखाराम पावरा, उमेश पाटील आणि राजेंद्र पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.