अमळनेरच्या हिनाया बागवानने अवघ्या 4 व्या वर्षी पहिला रोजा पूर्ण करून जिंकली सर्वांची मने!

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – बालपन म्हणजे निरागसता आणि जिद्द यांचा सुंदर संगम. अमळनेर येथील हिनाया खलिल बागवान हिने अवघ्या चार वर्षांच्या कोवळ्या वयात पहिला रोजा पूर्ण करून समाजासमोर एक अनुकरणीय उदाहरण ठेवले आहे. तिच्या या श्रद्धा आणि जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रमजान महिन्याची पवित्रता आणि उपवासाचे महत्त्व लहान वयातच समजून, हिनायाने संपूर्ण दिवस उपवास धरून रोजा पूर्ण केला. तिच्या या धैर्याबद्दल कुटुंबीयांसह गावातील अनेकांनी तिचे अभिनंदन केले. लहानग्या हिनायाचा हा समर्पणभाव पाहून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिनायाच्या या अद्वितीय कर्तृत्वाने धार्मिक तसेच सामाजिक पातळीवर एक सकारात्मक संदेश दिला आहे. तिच्या कुटुंबीयांनीही तिच्या जिद्दीचे कौतुक करत, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.