महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले..

24 प्राईम न्यूज 11 मार्च 2025. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील सहायकाला 13,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदार: 26 वर्षीय पुरुष
आरोपी: दिनेश सूर्यभान वाघ (39 वर्षे), महसूल सहायक (गौण खनिज), उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे
प्रकरणाचा तपशील:
तक्रारदाराच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरारी पथकाने 5 मार्च 2025 रोजी कोकले (ता. साक्री) येथे जप्त केले होते. हे वाहन सोडवण्यासाठी आरोपीने 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार 7 मार्च 2025 रोजी केली. लाचलुचपत विभागाने 7 आणि 10 मार्च रोजी पडताळणी केली असता, आरोपीने तडजोडीनंतर 13,000 रुपये घेतले. लाच स्वीकारताना महसूल सहायक दिनेश वाघ यांना रंगेहात पकडण्यात आलेआरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आरोपीचा मोबाईल जप्त घरझडती सुरू हॅश व्हॅल्यू नोंद सापळा व तपास अधिकारी सचिन साळुंखे (पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे आणि सहकारी
➡️ नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क साधावा.
📞 टोल फ्री क्रमांक: 1064