अमळनेर येथे आज जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा होणार…

आबिद शेख/अमळनेर
जागतिक ग्राहक हक्क दिन आज अमळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून “Transition to Sustainable Lifestyles” ही यंदाच्या वर्षीची थीम राहणार आहे. कार्यक्रमात ग्राहक हक्कांविषयी जनजागृती केली जाणार असून, नागरिकांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमास सर्व नागरिक, व्यापारी, ग्राहक संघटना तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, अमळनेर यांनी केले आहे.