सोन्याच्या दरात विक्रमी वाढ – प्रतितोळा ९१ हजारांच्या उच्चांकावर..

24 प्राईम न्यूज 16 मार्च 2025
सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला असून प्रतितोळा ९१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ही वाढ आतापर्यंतची सर्वाधिक आहे. जागतिक स्तरावर वाढलेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे आणि अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्याने अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किमतींचा प्रभाव भारतातील सोन्याच्या दरांवरही दिसून येत आहे.