गोरक्षकच निघाला गोमातेचा चोर! . – – जळगाव शहरातील अँडव्होकेट केदार भुसारी यांच्या गोठ्यात हरवलेल्या गायी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

24 प्राईम न्यूज 23 मार्च 2025.
जळगाव येथील सलीम घासी खान (वय 32, रा. सिटी कॉलनी, अकबर मस्जिदसमोर, जळगाव) यांचा दुधाचा व्यवसाय असून, त्यांच्या तीन गायी 11 मार्च रोजी हरवल्या होत्या. गायींचा शोध सुरू असताना 21 मार्च रोजी सलीम घासी व त्यांचे पुतणे समीर खान, समशेर खान हे शिवाजीनगर, डाळ फळ परिसरात असलेल्या अँडव्होकेट केदार भुसारी यांच्या गोठ्याजवळ गेले असता त्यांच्याच गायी तेथे असल्याचे निदर्शनास आले.
गायी ओळख पटताच त्यांनी तत्काळ व्हिडिओ शूट केला आणि मालकाने आवाज दिल्यावर गायींनी प्रतिसाद दिला. यानंतर सलीम घासी यांनी शहर पोलीस ठाणे, जळगाव येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर क्रमांक 116/25, भादंवि कलम 379 आणि बीएनएस कायदा 303 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादीने पोलिस अधीक्षक जळगाव यांना लेखी तक्रार दिली असून, पोलिसांसोबत पुन्हा त्या गोठ्यात गेल्यावर गायी गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एडव्होकेट केदार भुसारी, त्यांच्या पत्नी अंजली भुसारी आणि इतरांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिवाजी शिखरे करत आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली गायींचीच चोरी करणाऱ्यांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.