अमळनेर तालुक्यात शिवार रस्ते मोकळे; पाच गावांमध्ये दहा रस्त्यांवरील अतिक्रमण हटवले..

आबिद शेख/अमळनेर

गाव नकाशावरील शिवार रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेंतर्गत तालुक्यातील पाच गावांमधील दहा शिवार रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आले.
पिंपळे खुर्द येथे साडे पाच किलोमीटर लांबीच्या तीन शिवार रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले. मोहिमेपूर्वी झालेल्या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी सहमती दर्शविल्याने हे काम शांततेत आणि सामंजस्याने पूर्ण झाले.
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, अव्वल कारकून (रोहयो) ए. डी. परदेशी, भूमी अभिलेख विभागाचे ए. के. गिरी व एस. एम. थोरात, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (रोहयो) किशोर बी. ठाकरे, तांत्रिक सहाय्यक (रोहयो) सचिन पाटील, तसेच पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द व चिमनपुरी येथील ग्रामस्थ, सरपंच-उपसरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष निंबा चौधरी, पोलीस पाटील सुदाम बळीराम पाटील, भैया बळीराम पाटील, नानाभाऊ हिलाल पाटील, सुरेश नाना पाटील, आधार राजाराम पाटील, संदीप पाटील, रावसाहेब पाटील आणि सर्व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली.