ग्रामविकास अधिकाऱ्यास 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले..

24 प्राईम न्यूज 23 मार्च 2025
जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो (ACB) जळगाव यांनी धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथे ग्रामविकास अधिकाऱ्यास 25,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदार (37) यांनी त्यांच्या गावात गटारी आणि गावहाळ बांधण्याचे 2,70,000 रुपयांचे काम केले होते. या कामाच्या बिलापोटी त्यांना 2,64,000 रुपये प्राप्त झाले. मात्र, ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (37, ग्रामसेवक, खर्दे बुद्रुक) यांनी या बिलांसाठी 10% लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम 25,000 रुपयांवर ठरली.
तक्रारदाराने ACB जळगावकडे तक्रार दाखल केली. तपासणीदरम्यान आरोपीने सरपंचालाही काही न देता संपूर्ण रक्कम स्वतःसाठी मागितल्याचे स्पष्ट झाले. ठरल्याप्रमाणे 22 मार्च 2025 रोजी ग्रामविकास अधिकाऱ्याला 25,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सापळा व पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश ठाकूर, पोलिस उपअधीक्षक, ACB जळगाव पो.उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, पो.कॉ. अमोल सूर्यवंशी
मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी अशा भ्रष्टाचारविरोधी मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क:
टोल-फ्री क्रमांक: 1064. ACB जळगाव संपर्क क्रमांक: 0257-2235477