जनता नाही, पुढारीच जातीयवादी – नितीन गडकरी

24 प्राईम न्यूज 23 मार्च 2025
“जातीयवाद सामान्य जनतेत नाही, तर तो पुढाऱ्यांमध्ये आहे. राजकीय स्वार्थासाठी राजकारणी जात उभी करतात,” अशी परखड टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. शनिवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, “मी लोकसभेत निवडून आल्यानंतर स्पष्ट सांगितले की, माझ्या तत्वांनुसार राजकारण करेन. मत द्यायचे असेल तर द्या, नसेल तरी हरकत नाही. जो मत देईल त्याच्यासाठीही काम करेल, जो देणार नाही त्याच्यासाठीही करेल.”
ते पुढे म्हणाले, “समाजातील मागासपणा हा राजकीय स्वार्थाचा विषय बनला आहे. कोण सर्वात जास्त मागास आहे, याचीही चढाओढ लागलेली आहे.” राजकारण हे कर्तृत्वाच्या आधारावर असले पाहिजे, केवळ नेत्याचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून त्याला संधी मिळाली पाहिजे, हे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.