अमळनेरचा अभिमान! दिनेश बागडेने खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.

आबिद शेख/अमळनेर
नवी दिल्ली येथे २० ते २७ दरम्यान आयोजित खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेत अमळनेरच्या दिनेश बागडेने सुवर्ण कामगिरी केली आहे. १०७ किलो वजनगटाच्या अंतिम फेरीत सात स्पर्धकांमध्ये लढत देत दिनेशने प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
गेल्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या दिनेशने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यंदा सुवर्णपदक मिळवण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले. त्याच्या या विजयाने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दिनेशच्या विजयावर आनंदाचा वर्षाव दिनेशच्या यशाने अमळनेरमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याच्या जिद्दीला आणि मेहनतीला सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.