अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्रीस पाच दिवस बंद.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे दि. 28 मार्च ते दि. 1 एप्रिल 2025 या कालावधीत शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार बंद राहणार आहेत.
धारक मापाडी कै. तुकाराम गबा भोई यांच्या निधनानिमित्त आणि व्यापारी असोसिएशनच्या वर्ष अखेरच्या आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यवहार बंद राहण्याचे कारणे:
- दि. 27 मार्च 2025: शेवटचा व्यापाराचा दिवस
- दि. 28 मार्च ते 1 एप्रिल 2025: व्यापारी शेतमाल खरेदी-विक्री करणार नाहीत
- दि. 29 व 30 मार्च 2025: शनिवार व रविवार सुट्टी
- दि. 31 मार्च 2025: रमजान ईद निमित्त बाजार समिती बंद
- दि. 1 एप्रिल 2025: बँकांचे आर्थिक व्यवहार बंद
या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी दि. 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान शेतमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.