वकीलांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर वकील संघाचा कामकाज बहिष्कार..

आबिद शेख/अमळनेर
भुसावळ वकील संघाचे सदस्य अॅड. प्रविण कोळी आणि त्यांच्या आईवर तसेच धडगाव वकील संघाचे सदस्य अॅड. आपसिंग वळवी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर वकील संघाने ठोस भूमिका घेतली आहे.
अमळनेर वकील संघाची दिनांक २६ मार्च रोजी झालेल्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला की, दि. २७ मार्च २०२७ रोजी संघाचे कोणतेही सदस्य न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नाहीत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल तसेच शासनाकडे निवेदन पाठविण्यात येणार आहे.
वकीलांना सुरक्षिततेची हमी मिळावी, अशी संघाची प्रमुख मागणी असून, जर तत्काळ कारवाई झाली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.