प्रभाग क्र. 14 मध्ये 20 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प – महिलांचा नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन..

आबिद शेख/अमळनेर
विद्या विहार कॉलनी, मुंदडा नगर, सोनार नगर आणि अन्य भागातील रहिवाशांना गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन छेडले.
नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. 21 तारखेला त्यांनी नगरपरिषदेला पत्र देऊन 80 फुटी रिंग रोडवरील वारंवार पाईपलाइन फोडणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी नगरपरिषदेत मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या दालनात महिलांनी ठिय्या आंदोलन केले. परिस्थितीची दखल घेत, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः जागेवर येण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात रवि पाटील, मिलींद आप्पा, संजय पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, कल्पेश साळुंखे यांसह माळी ताई, वैशाली शेवाळे, सुनीता शिंदे, रंजना सनदाशिव, वैशाली गोसावी, ज्योती वारुळे, ललिता चौधरी, वर्षा पाटील आणि 100 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.