धुळे जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांची महत्वपूर्ण बैठक, पक्ष बळकट करण्यावर भर.

24 प्राईम न्यूज 27 मार्च 2025.
धुळे, 26 मार्च 2025 – तेलंगणा काँग्रेस कमिटीचे नामांकित नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांनी आज धुळे जिल्ह्याचा एक दिवसाचा दौरा केला. माजी आमदार कुनाल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी धुळे जिल्हा आणि मालेगाव शहरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन केले.
मालेगाव शहर काँग्रेस कमिटीचे नेते जैनुल आबेदीन ऊर्फ झीनो मेंबर यांनी मालेगावच्या मुस्लिम समाजासमोर उभ्या राहिलेल्या समस्यांबाबत संदीप यांना सविस्तर माहिती दिली आणि त्यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली.
या बैठकीस धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शकील अहमद शाहीन उपस्थित होते.