दंगा करणारा, आक्षेपार्ह पोस्ट करणारा कुख्यात आरोपी एक वर्षासाठी.. स्थानबद्ध..!                       -जिल्हा प्रशासनाची कारवाई, गुन्हेगारांवर विशेष नजर …

0

नंदुरबार /फहीम शेख

पोलीस ठाणे हद्दीत दंगा घडवुन शासकीय नोकरावर हल्ला करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी करणे, जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, तसेच सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करुन दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारचे गंभीर गुन्हे असे एकुण 07 गुन्हे करणा-या शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या, वय 33 वर्षे, रा. अली साहाब मोहल्ला, जि. नंदुरबार यास एक वर्षासाठी एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील गुन्हेगारांचे वर्तणुकीत सुधारणा होत नसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचा बडगा नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचेकडुन उचलला जात आहे.सदर स्थानबद्ध प्रस्तावास मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार श्रीमती मिताली सेठी यांचेकडून मंजुरी मिळताच आरोपी शेख शहेबाज शेख शरफुद्दीन ऊर्फ बबलू काल्या, वय 33 वर्षे, रा.अली साहाब मोहल्ला, जि. नंदुरबार यास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ यांचे पथकाकडून जिल्हयातुन स्थानबद्ध करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!