अमळनेर येथे पाचवे अहिराणी साहित्य संमेलन संपन्न; अहिराणी भाषेसाठी महत्त्वपूर्ण ठराव संमत..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथे झालेल्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठराव मांडून आणि रसिक प्रेक्षकांच्या मंजुरीने संपन्न झाला.
संमेलनाच्या समारोपीय सत्रात अहिराणी भाषेच्या विकासासाठी खालील ठराव मांडण्यात आले आणि संमेलनात उपस्थितांनी हात वर करून ते मंजूर केले—
- अहिराणी भाषेचा समावेश महाराष्ट्राच्या राजपत्रित भाषांमध्ये करावा.
- प्राथमिक स्तरावर मराठी अभ्यासक्रमात अहिराणी भाषेची ओळख करून द्यावी.
- मराठी अभ्यासक्रमात अहिराणी भाषेतील एक धडा समाविष्ट करावा.
- अहिराणी साहित्यिकांसाठी स्वतंत्र पुरस्कार जाहीर करावेत.
- अहिराणी भाषेतील पुस्तके, साहित्य व ऑडिओ बुक्ससाठी शासनाने अनुदान द्यावे.
- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावे.
संमेलनाचे संयोजक प्रा. लिलाधर पाटील यांनी अहिराणी बोलीतून हे ठराव सादर केले. अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी संमेलनास मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात स्वागताध्यक्ष डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संदिप घोरपडे, के. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, सौ. वसुंधरा लांडगे, प्रकाश महाले, गोकुळ बागुल, प्रकाश पाटील, रविंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहिराणी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये अभिनेते, कलाकार, रील स्टार, लेखक यांचा समावेश होता. त्यामध्ये मधुकर खैरनार नकाने, खान्देशी फॉरेनर अरुण सोनार, विजय जगताप धुळे, अरुण जाधव एरंडोल, विद्या भाटिया धुळे, वसंतराव पाटील अमळनेर,संभाजी देवरे अमळनेर, अहिराणी चित्रपट निर्माता गौतम शिरसाट नंदुरबार, विठ्ठल चौधरी, वंजारी कपाट, वनमाला बागुल पुणे, धनंजय चित्ते, ओम भोई अमळनेर, विश्राम बिरारी, समाधान बेलदार, अंजना बर्लेकर पुणे, अशोक पाटील भडगाव यांचा समावेश होता.
कार्यक्रमात कवी रमेश धनगर व कवी शरद धनगर यांनी आपल्या कवितांनी रंगत आणली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. कुणाल पवार यांनी केले, तर आभार बापुराव ठाकरे यांनी मानले.