धार येथे ईद उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव….

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर -धार येथे ईद उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली. मरवड पोलीस स्टेशनचे एपीआय जिभाऊ तुकाराम पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. गावातील हिंदू बांधव देखील दरवर्षीप्रमाणे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला धार गावाचे माजी सरपंच व विद्यमान एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन तात्यासाहेब गणेश धोंडू पाटील, माजी सरपंच दगडू गुरुजी, प्रमोद पाटील, शशिकांत बोरसे, अरुण पाटील, संजय पाटील, संजय टेलर, भगवान पाटील यांसह अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम समाजाच्या बांधवांना शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे शेतकी संघाचे माजी संचालक व माजी प्रभारी सरपंच अलीम मुजावर, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व्ही. एन. मुजावर, ग्रामपंचायत सदस्य जाकीर भाई शेख, सत्तार मुजावर, बाबू पेंटर, हाजी नईम मुजावर, शौकत सय्यद, गयास मुजावर, नासिर मुजावर, राजिक मुजावर, मुशीर मुजावर, मुक्तार मुजावर, अजीम जाहीर मुजावर, रफा मुजावर, जमाल मुजावर यांसह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम मुजावर यांनी केले, तर आभारप्रदर्शन व्ही. एन. मुजावर यांनी मानले. ईदच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर उदाहरण या कार्यक्रमातून पाहायला मिळाले.