अल्लाह जगात शांती व देशात भाईचारा राहू दे अल्लाहकडे शांतीसाठी प्रार्थना; ईदच्या नमाजात देशाच्या विकासाची कामना..

24 प्राईम न्यूज 1 April 2025
जळगाव शहरातील अजिंठा चौक येथील मुस्लिम ईदगाह मैदानावर सोमवारी ३१ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता इद ची नमाज अदा करून ईद साजरी करण्यात आली.
यावेळी मौलाना उस्मान कासमी यांनी विश्वात शांती नांदू दे व आमच्या भारतात भाईचारा ठेव व भारत विकसिटी देशात अग्रेसर राहो अशी विशेष प्रार्थना अल्लाहाकडे यावेळी करण्यात आली, तेव्हा उपस्थित समाज बांधवांनी आमीन म्हणून त्यास दुजोरा दिला.
शेवटी एकमेकांना शुभेच्छा देत ईदगाह मैदान गजबजुन गेले.
मौलाना उस्मान कासमी यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज व अरबि खुत्बा तसेच दुवा अदा करण्यात आली.
सुरुवातीला मौलाना मुफ्ती सलमान सलिक यांनी उर्दूमध्ये प्रवचन सादर केले.
ईद गाह मैदानावर घोषणा
नमाज व दुवा झाल्यानंतर ईद गाह मैदानावर सामाजिक संघटनांनी वक्फ संशोधन बिल मागे घ्या, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम मागे घ्या ,
अशा घोषणा देऊन इसराइल प्रॉडक्टवर बहिष्काराची घोषणा करण्यात आली. तसेच गाजा येथे इजरायल मार्फत सुरू असलेल्या युद्धाचा निषेध करण्यात आला व गाजा मधील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मस्जिद साठी चंदा
उस्मानिया कॉलनीमध्ये नवीन मस्जिद लतीफ चे बांधकामासाठी उपस्थित समाज बांधवांनी चंदा जमा केला तो सुमारे ३ लाख ४२ हजार रुपये जमा झाला.
ईदगाह ट्रस्टचा ठराव
कब्रस्तान माधिल कोणत्याही कबरीवर पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करता येणार नाही तसेच त्याच्यावर सिमेंटचे ब्लॉक अथवा जाडी लावता येणार नाही अशा प्रकारचा ठराव सर्व समाज बांधवांकडून संमत करून घेतला.
ईद गाह चा वार्षिक ताळेबंद सादर
जनरल सेक्रेटरी अजिज सालार यांनी ईदगाह ट्रस्ट चा वार्षिक जमाखर्च सादर केला.
मौलाना नसीर यांनी नमाजची रूपरेषा प्रस्तुत केली.
या संघटनांनी केला निषेध व दिल्या घोषणा
एकता संघटन जळगाव, इस्लामिक युथ फेडरेशन, अल्खैर ट्रस्ट, वहिदत ए इस्लामी, मलिक फाउंडेशन, जळगाव जिल्हा मणियार बिरादरी, अक्सा बॉईज, या संघटनेंनी सहभाग नोंदवत विविध घोषणा देऊन वक्फ संशोधन बीलाचा निषेध नोंदविला.
ईद गाह मैदानावर शुभेच्छा
ईद गाह मैदानावर सुमारे ४० ते ४५ हजार लोकांनी नमाज अदा केली व त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्यात प्रामुख्याने माजी उपमहापौर करीम सालार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष एजाज मलिक, ईद गाह ट्रस्ट अध्यक्ष वहाब मलिक, माजी जनरल सेक्रेटरी फारूक शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद , वहिदात इस्लामीचे अतिक शेख, मरकज चे ताहेर शेख, अक्सा बॉईज आमिर शेख, इदगा ट्रस्टचे अशपाक बागवान , अमजद पठाण, जॅकी पटेल , हारीश सय्यद, इब्राहिम खाटीक, अमीन बादलीवाला , मौलाना रहीम पटेल, रज्जाक पटेल, गणी मेमन, तय्यब शेख व उमर शेख एडवोकेट आमिर शेख आदींनी एकमेकांना इद च्या शुभेच्छा सादर केल्या