अंदरपुरा मोहल्ल्यात मोफत नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद – ६१ नागरिकांची तपासणी..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – शहरातील अंदरपुरा मोहल्ल्यात विप्रो केअर्सच्या सहाय्याने “आधार शहरी आरोग्य प्रकल्प” अंतर्गत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच पार पडलेल्या या शिबिरात तब्बल ६१ नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना नेत्रसंबंधी तक्रारींसाठी मोफत निदान व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. अशा प्रकारच्या शिबिरांमुळे वेळेत उपचार घेता येतात आणि गंभीर आजार टाळता येतात, हे विशेष.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पंकज पाटील, संजय शिंदे, दिप्ती गायकवाड, योगिता पाटील आणि रईसा बी महंमद अली सैय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आयोजकांचे कौतुक होत आहे.