बिलखेडे येथे वाळू तस्करीवर कारवाई – ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर (ता.८): उपविभागीय अधिकारी मा. श्री. नितीन कुमार मुंडावरे साहेब आणि तहसीलदार मा. श्री. रुपेश कुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे बिलखेडे येथे वाळू तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करून तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले आहे.
ही कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली असून यामध्ये मंडळ अधिकारी वाय. आर. पाटील (हेडावे), अभिमान जाधव, ग्राम महसूल अधिकारी कन्हेरे, जितेंद्र जोगी (निंब), जितेंद्र पाटील (शिरसाळे), विक्रम कदम (शहापूर), पवन शिंगारे (सावखेडा), परवर तडवी (निंभोरा), राजेंद्र केदार (पळसदडे) आणि आशिष पारधे (सारबेटे बु.) या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
वाळू तस्करीस आळा बसावा व कायद्याची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने महसूल प्रशासनाने पावले उचलली असून पुढील तपास सुरू आहे.