डॉ. शरद बाविस्कर यांच्याकडून पत्रकार आबिद शेख यांना कलात्मक सन्मान..

24 प्राईम न्यूज 9 April 2025
अमळनेर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून एक अनोखा सन्मान केला आहे. त्यांनी पत्रकार आबिद शेख यांचे छायाचित्र स्वतःच्या हाताने कुंचल्यातून साकारले आणि त्यांना खास भेट म्हणून प्रदान केले.
या प्रसंगी डॉ. आवेस हे देखील उपस्थित होते. डॉ. बाविस्कर हे वैद्यकीय सेवेसोबतच कलेतही गाढ रस असून, वेळात वेळ काढून ते समाजातील विविध मान्यवरांचे चित्र रेखाटत असतात.
डॉ. बाविस्कर यांचे हे कार्य वैद्यकीय क्षेत्रातील मानवी मूल्ये आणि संवेदना कलात्मकतेच्या माध्यमातून मांडणारे ठरत आहे.