अमळनेर तालुक्यात ७८.८२ टक्के नागरिक घेतात अन्न धान्याचा लाभ. -पडताळणीत चुकीची महिती दिल्यास रेशनकार्ड रद्द होणार

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : शासनाच्या वतीने १ एप्रिल ते
३१ मे दरम्यान अपात्र शिधा पत्रिका मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी फॉर्म भरून देताना खरी, योग्य व अचूक माहिती सादर करावयाची आहे अन्यथा शिधा पत्रिका अपात्र ठरून रद्द होऊ शकतात. अमळनेर तालुक्यात २ लाख १३ हजार ६५८ नागरिक म्हणजे ७८.८२ टक्के नागरिक अन्न धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाने बोगस लाभार्थी शोध मोहीम सुरू केली आहे.नागरिकांनी आठवणीने आपल्या रेशन दुकानदाराकडे अर्ज भरून त्याला लागणारे कागदपत्र आणि अचूक माहिती सादर करावी. चुकीची माहिती दिल्यास त्याचे रेशनकार्डच रद्द होऊ शकते. – रुकसाना शेख, पुरवठा निरीक्षण अधिकारी, अमळनेर
बोगस रेशनकार्ड, बोगस लाभार्थी तपासणी मोहीम सुरू झाली असून ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. त्यांनंतर १५ जूनपर्यंत शासनाला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला जाणार आहे. रुपेशकुमार सुराणा
रेशनकार्ड तपासणीत एका कुटुंबात अथवा एका पत्त्यावर एकच रेशनकार्ड दिले जाईल. एक लाखाच्या वर उत्पन्न असलेले सर्व पिवळे आणि केशरी रेशनकार्ड निलंबित केले जातील. नागरिकांनी एक वर्षाच्या आतील रहीवास पुरावा म्हणून आधार कार्ड, बँक पासबुक, वीज बिल, फोन बिल, एलआयसी पॉलिसी, असे १० पुराव्यापैकी एक पुरावा सादर करणे अनिवार्य असेल- नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर