अमळनेरमध्ये मोटरसायकल चोरी प्रकरण उघडकीस, एका संशयितास अटक..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.30 ते 9.20 वाजेच्या दरम्यान पुनम हॉटेल जवळून हिरो फॅशन I3s (MH 19 EE 7165) ही मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार महेंद्र धनसिंग पाटील (रा. झाडी, ता. अमळनेर) यांनी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 531/2024, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये नोंद करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक श्री. केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथक सक्रिय झाले. पो.उ.पनि. राजू जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.उ.नि. नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, गणेश पाटील, राजेंद्र देशमाने, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव, अमोल पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे आणि उदय बोरसे यांचा समावेश होता.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने हिरालाल छोटू पाटील (रा. झाडी, ता. अमळनेर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पो.हे.कॉ. विनोद सोनवणे व पो.कॉ. भूषण परदेशी करत आहेत.
अमळनेर पोलीस स्टेशनमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, चोरी किंवा अन्य गुन्ह्यांबाबत कोणतीही उपयुक्त माहिती असल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.