शिरुड नाका परिसरात ठेक्याची कुस्ती स्पर्धा आज. . – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर येथील जय हिंद व्यायाम शाळा व राजे शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठेक्याची कुस्ती स्पर्धा येत्या आज संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेस मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे.
शिवाजी नगर, शिरुड नाका परिसरातील जय हिंद व्यायाम शाळेच्या पटांगणावर होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल पाटील असतील.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते तसेच मुक्तद्वार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.