राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात अयाज मोहसीन यांची जिल्हाध्यक्षपदी निवड..

24 प्राईम न्यूज 14 April 2025
मिरज येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या थाटात पार पडले. या अधिवेशनाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप घुगे, ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आणि पत्रकार संघ डिजिटलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांचा समावेश होता.
या अधिवेशनात जळगाव येथील न्यूज 24 चॅनलचे प्रतिनिधी अयाज मोहसीन यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (डिजिटल)च्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मिडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.