डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमळनेर शहरात पोलिसांचा रूट मार्च..

आबिद शेख/ अमळनेर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार तसेच होमगार्ड यांचा सहभाग लाभला.
हा रूट मार्च गांधीपुरा, पाच कंदील, सुभाष चौक, कुंटे रोड, तिरंगा चौक, दगडी दरवाजा, फरशी रोड अशा शहरातील महत्त्वाच्या भागांतून पार पडला. पोलिस प्रशासन सतर्क असून अनुचित प्रकारांना आळा बसावा या हेतूने हा खबरदारीचा उपाय म्हणून राबविण्यात आला.
रूट मार्चनंतर सर्व अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ताची सविस्तर माहिती देत ब्रीफिंग करण्यात आले.