डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम

आबिद शेख/अमळनेर
धुळे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात इर्शाद भाई जहागिरदार, धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, महिंद्रा दादा शिरसाट, जावेद भाई बिल्डर, आनंद सैंदाणे, वसीम पिंजारी, रोहन पोळ तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक योगदानाचे स्मरण करण्यात आले व त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प घेण्यात आला.