इर्शाद भाई जहागिरदार यांची 16 वी इस्तेमाई शादी मेळाव्यात विशेष उपस्थिती..

आबिद शेख/अमळनेर
पठवा अतार मुस्लिम जमात आयोजित 16 व्या इस्तेमाई शादी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते इर्शाद भाई जहागिरदार यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष इब्राहिम प्लंबर यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात समाजातील एकोपा आणि सामूहिक विवाहाच्या उपक्रमाचे कौतुक करत इर्शाद भाई जहागिरदार यांनी समाजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.