अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागात राष्ट्रीय अग्निशमन दिवस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागात राष्ट्रीय अग्निशमन दिवस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्तरित्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्य अधिकारी रवींद्र चव्हाण, अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी, वाघ साहेब, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, महेश जोशी, सोमचंद संदनशिव, रवींद्र लांबोळे, दिनेश बिऱ्हाडे, फारुक शेख तसेच सर्व अग्निशमन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अग्निशमन दलाच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडून उपस्थितांना प्रेरणा दिली.