जयहिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्रमंडळातर्फे भव्य कुस्ती स्पर्धा. – धुळ्याच्या रितीक राजपूतने मानाची गदा ११ हजार रोख पटकावले..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : शिरूड नाका येथील छत्रपती शिवाजी नगर भागात १३ एप्रिल रोजी जयहिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्रमंडळाच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेत धुळे येथील रितीक राजपूत याने पाचोऱ्याच्या विपुल जावडेकर याच्यावर मात करत मानाची गदा आणि ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. एकूण २२ ठेक्याच्या कुस्त्या रंगल्या
मुख्य लढतीचे उदघाटन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी स्पर्धा म्हणजे केवळ मनोरंजन नसून युवकांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि नवचैतन्य निर्माण करणारे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी विनायक कोते, परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, तसेच प्रशांत निकम, चेतन सोनार, डॉ. संदीप जोशी, डॉ. भूषण पाटील, चेतन राजपूत, संजय पाटील, किरण पाटील, विवेक अहिरराव, भरत पवार, सुनील मोरे, ज्ञानेश्वर पाटील, पिंटू सोनार, विनोद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन माजी नगरसेवक प्रताप शिंपी, सुरज शिंपी, पवन शिंपी, जीवन पवार, अमोल चौधरी, सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. जळगाव, धुळे, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव आदी ठिकाणाहून नामवंत पैलवान सहभागी झाले होते.
सूत्रसंचालन प्रवीण पाटील व अरुण पाटील यांनी केले, तर पंच म्हणून रावसाहेब पैलवान, विठ्ठल पैलवान, विनोद पैलवान, संजय पैलवान यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बबलू पाटील, मधू चौधरी, गिरीश पाटील, पवन चौधरी, सुनील पाटील, दीपक चौधरी, भोमेश पैलवान आदींनी विशेष मेहनत घेतली. बाहेरगावाहून आलेल्या पैलवानांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांचा रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.