प्रेमविवाह केलेल्या मुलीवर बापाचा गोळीबार, मुलीचा मृत्यू, जावई जखमी..

24 प्राईम न्यूज 28 एप्रिल 2025
चोपडा -प्रेमविवाह केलेल्या मुलीवर तिच्या वडिलांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना चोपडा येथे घडली. मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, जावई गंभीर जखमी आहे.
तृप्ती करण मंगले (वय २४) हिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय २८) याच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे पुण्यातील कोथरूड येथे राहत होते. मात्र तृप्तीच्या वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. शनिवारी रात्री १० वाजता चोपडा येथील आंबेडकर नगरमध्ये अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात तृप्ती व अविनाश आले असल्याची माहिती तृप्तीच्या वडिलांना मिळाली.
सेवानिवृत्त सीआरपीएफ जवान करण अर्जन मंगले (वय ४८) यांनी कार्यक्रमस्थळी येऊन रिव्हॉल्वरने तृप्ती आणि अविनाशवर तीन राउंड गोळीबार केला. यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे. त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर संतप्त वऱ्हाड्यांनी करण मंगलेला पकडून चांगलाच मारहाण केली. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.