मन्यार बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पहलगाम च्या मृत्यू मुखी पडलेल्यांना श्रद्धांजली सह पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध..

24 प्राईम न्यूज 28 April 2025
शिजगर मुस्लिम समाज फाउंडेशन सुप्रीम कॉलनी जळगाव च्या माध्यमाने तिसरा सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते सदर सामूहिक विवाह सोहळ्यात जळगाव जिल्हा मणियार
बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी तीन ठराव सादर केले असता त्यास सर्व सन्मित्रमंजुरी देण्यात आली.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहेलगामधील भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ भारतीयांना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यासोबत अतिरेक्यांचा धिक्कार करण्यात आला व नववधूंच्या हस्ते पाकिस्तानचे झेंडे व अतिरेक्याची प्रतिमा फाडण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष फारुक शेख, सुप्रीम बीरादारीचे अध्यक्ष डॉक्टर फिरोज अहमद, अर्कोचे बशीर बुरहानी,टिकी इस्टेट चे कादर कच्ची, अब्दुल ट्रान्सपोर्ट चे अन्वर खान, कुलजमातीचे सैयद चांद, मरकज चे सलीम सेट, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, यावलचे करीम मेंबर, पाचोराचे इरफान इकबाल , साखळी चे असलम खान हजर होते. शिसगार समाजाचे फाउंडेशनचे शेख फारूक, शेख आसिफ शेख अखिल, नूर मोहम्मद, अफजल मणियार, अकील करीम सोबत हजारो लोकांची उपस्थिती होती.