मढी येथे सीसीटीव्ही बसविल्याबद्दल श्री. योगेश (आप्पा) महाजन यांचा क्षत्रिय काच माळी समाजातर्फे सत्कार

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष श्री. योगेश (आप्पा) महाजन यांचा क्षत्रिय काच माळी समाजाच्या वतीने मढी येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या उदार देणगीतून मढी येथील क्षत्रिय काच माळी समाज संस्थानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यंत्रणेचे उद्घाटन श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात समाज अध्यक्ष मा. श्री. मनोहर महाजन सर यांनी श्री. महाजन यांचा विशेष सत्कार करून समाजहितासाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता पार्टी अमळनेर शहराध्यक्षपदाची जबाबदारी माळी समाजातील व्यक्तीला दिल्याबद्दल, जिल्ह्याचे लोकप्रिय नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन व जळगाव लोकसभा क्षेत्राच्या खासदार मा. स्मिताताई वाघ यांचे मनःपूर्वक आभारही व्यक्त करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करताना श्री. योगेश महाजन म्हणाले, “समाज हा माझ्यासाठी सर्वप्रथम आहे. शहराध्यक्ष पद माझे वैयक्तिक नसून संपूर्ण माळी समाजाचे आहे. समाज संघटन व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन.”
या कार्यक्रमाला क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाचे अॅड. सुदाम माळी, श्री. गणेश महाजन सर, श्री. कैलास महाजन, श्री. गंगाराम महाजन, श्री. गुलाब बापू, श्री. पांडुरंग माळी, श्री. बी.आर. महाजन सर, श्री. ज्ञानेश्वर महाजन, श्री. रमेश माळी, श्री. मनोहर माळी, श्री. अशोक महाजन, श्री. राजेंद्र महाजन, श्री. रविंद्र माळी, प्रा. डॉ. सुभाष महाजन, नगरसेवक मा. भाऊस