पवित्र जागेवर जाऊन देशाच्या शांतते साठी प्रार्थना करा : -आमदार अनिल पाटील

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर सुन्नी दारुल कजा व कब्रस्तान देखरेख कमिटी तथा एस.डी.आय. च्या माध्यमातून पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेंदू ज्वर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या व देशात शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन केले. तसेच, सौदी अरेबिया किंवा राज्यात हज यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मदतीचे आश्वासनही दिले.
या लसीकरण शिबिरात अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव, एरंडोल आदी परिसरातील हज यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पारोळा येथील महंमद मास्टर, हाजी शेखा मिस्तरी, फयाज मुबलिक, इम्रान शेख कादर, डॉ. रईस बागवान, डॉ. इम्रान अली शाह, डॉ. एजाज रंगरेज, सगीर नुरी, अझहर नुरी, सईद बागवान यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
लसीकरणासाठी नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी तसेच जळगाव येथील इक्बाल सर, मुख्तार अली सैय्यद, अनमोल यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फयाज खा पठाण, अब्दुल सत्तार मास्टर, हाजी कादर जनाब, हमीद जनाब, अखलाख शेख, फारुख सुरभी, इक्बाल शेख, अहेतेश्याम खान, शराफत अली, शेरखान पठाण, मुस्तफा प्लंबर, कमरोदीन, खालीक रसना, शब्बीर शेख, फयाज सर, रफिक शेख,मसूद मिस्त्री यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन अँड. रज्जाक शेख यांनी केले.