श्री अन्नपुर्णा माता प्राणप्रतिष्ठा व किर्तन महोत्सव ३ मे रोजी अमळनेर मध्ये.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर, ढेकू सिम रोड, लक्ष्मीनगर परिसरातील मंदिराचा वर्धापन दिन शनिवार, दिनांक ०३ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त वैशाख शुद्ध सप्तमीला गंगोत्पती आणि श्री अन्नपुर्णा माता देवी जिर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे.
हा सोहळा सकाळी १० वाजता ह.भ.प. शिवसाधिका साध्वी दुर्गा दिदी कर्मयोगिनी, गोशाळा आलियाबाद (संभाजीनगर) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजता साध्वी दुर्गा दिदी यांचे जाहीर हरिकिर्तन होणार असून, सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
श्री अन्नपुर्णा माता देवीची मूर्ती श्री शांतीलाल भाऊराव पाटील, रा. मुडी, प्र. डांगरी, ह.मु. लक्ष्मीनगर, ढेकू सिम रोड, अमळनेर यांनी मंदिरासाठी दान केली आहे. तसेच तेच या कीर्तन सेवेचे मानकरीही आहेत.
कार्यक्रम स्थळ:
श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर, लक्ष्मीनगर, ढेकू सिम रोड, अमळनेर
हरिकिर्तन वेळ:
रात्री ८.३० ते ११.००
आयोजक:
श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर सेवा समिती, लक्ष्मीनगर व ढेकू सिम रोड परिसर मित्र मंडळ, व महिला सत्संग मंडळ, अमळनेर