वक्फ कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी १५ मे रोजी

24 प्राईम न्यूज 6 May 2025

वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुढे ढकलली असून, आता ही सुनावणी १५ मे रोजी होणार आहे. ही सुनावणी न्या. भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होईल, अशी माहिती सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिली.
विशेष म्हणजे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होणार असून, त्यानंतर न्या. भूषण गवई देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश खन्ना यांनी वक्फ सुधारणा कायद्याशी संबंधित खटला न्या. गवई यांच्या खंडपीठाकडे वर्ग केला आहे. त्यानुसार या महत्त्वपूर्ण प्रकरणाची सुनावणी आता १५ मे रोजी होणार आहे.