राज्यस्तरीय सब ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी ७ मे रोजी..

24 प्राईम न्यूज 6 May 2025

– महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सब ज्युनिअर (१४ वर्षाखालील) मुलं व मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे ७ मे २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता पार पडणार आहे.
या चाचणीसाठी जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान जन्म झालेलेच खेळाडू पात्र असतील. पात्र ठरणाऱ्या सर्व मुलं व मुलींनी जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, तसेच फुटबॉल किट घेऊन सकाळी साडेसहा वाजता मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रत्येक खेळाडूसाठी सी.आर.एस. (CRS) नोंदणी आवश्यक असून, त्याशिवाय निवड प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही.
या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. अनिता कोल्हे, व सचिव फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.