स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, होणार महत्त्वाचा निर्णय?

24 प्राईम न्यूज 6 May 202

मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळल्या आहेत. या निवडणुकांविषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, या सुनावणीत निवडणुकांच्या वेळापत्रकावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
राज्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक महापालिका आणि नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक रखडली होती. आता केंद्र आणि राज्यातील निवडणुका पार पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केव्हा होणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
सदर याचिकेवरील आजची सुनावणी या निवडणुकांच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता असून, निवडणुकांचे बिगुल केव्हा वाजणार यावर चित्र स्पष्ट होऊ शकते.