वक्फ बचाव संविधान बचाव अंतर्गत करीम सालार व फारुक शेख यांचे एकत्रित कार्य. -कोणीही गैरसमज करू नये : फारुक शेख यांचे आवाहन

24 प्राईम न्यूज 5 May 2025

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या मार्गदर्शनाखाली “वक्फ बचाव – संविधान बचाव” या उद्देशासाठी १० एप्रिल ते ७ जुलै विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम, जनजागृती जाहीर सभा, पत्रकार परिषद सुरू असून जळगाव शहरात सुद्धा मुफ्ती खालिद यांच्या अध्यक्षतेखाली व फारुक शेख यांच्या समन्वयाने वक्फ बचाव समिती तर मुफ्ती हारून व डॉ करीम सालार यांच्या नेतृत्वात वक्फ बचाव कॉर्डीनेट कमिटीच्या माध्यमाने कार्य सुरू आहे. दोघांचे कार्य हे एकाच उद्देशा साठी आहे.
दिशाभूल व गैरसमज होऊ नये म्हणून आवाहन : फारुक शेख
सुप्रीम कॉलनी, जळगाव येथे रविवारी झालेल्या जनजागृती जाहीर सभेत एकाच व्यासपीठावर मुफ्ती खालीद, डॉ.अब्दुल करीम सालार, फारुक शेख व अयाज अली सय्यद यांची जाहीर सभा झाली त्यावेळी फारुक शेख यांनी स्पष्ट पणे जाहीर रित्या आवाहन केले की वक्फ बचाव संविधान बचाव या अंतर्गत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डातर्फे मिळालेल्या मार्गदर्शनानुसार जळगाव शहरात जरी दोन समिती कार्यरत असली तरी त्यांचे उद्देश एकच असल्याने कोणीही त्याबद्दल गैरसमज करू नये आम्ही दोघे एकाच उद्देशासाठी कार्यरत असून ज्या ज्या वेळी आम्हास एकत्रित कार्य करायचे आहे त्या त्या वेळी आम्ही एकत्रित कार्य करीत आहो व पुढे सुद्धा करणार आहोत त्यामुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील लोकांनी कोणताही गैरसमज करू नये असे त्यांनी व्यासपीठावरून जाहीर रित्याआव्हान केले आहे.
महत्त्वपूर्ण व दिशा देणारी सभा – सालार
मुफ्ती खालिद यांच्या अध्यक्षते खाली व सुप्रीम कॉलनीतील सर्व पंथीय मस्जिद चे मौलाना व विश्वस्तांनी खुल्या मैदानावर आयोजित केलेली ही सभा अत्यंत महत्व पूर्ण व दिशा देणारी सभा असल्याचे सुतोवाच सालार यांनी केले कारण कार्यक्रमाचे आयोजन सुप्रीम कॉलनीतील तरुणांनी केले होते व त्यात सर्व पंथीय मशिदीचे इमामांचा पुढाकार होता तर व्यासपीठावर सर्व एकत्रित होते.
यांनी केले मार्गदर्शन
सभेत प्रमुख वक्ते डॉक्टर अब्दुल करीम सालार, फारुक शेख व अयाज अली यांनी या काळया कायद्याची सर्व प्रकार ची माहिती जनसमुदायासमोर ठेवली व हा कशा प्रकारे किती असविधानिक व हुकूमशाहीचा कायदा आहे हे पटवून दिले.
यासाठी आपण सर्वांनी लोक तांत्रिक पद्धतीने त्याचा विरोध करणे आवश्यक आहे.
सभेत मोठ्या प्रमाणात महिलांची सुद्धा उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना तौफिक शरीफ शाह, कुराण पठण मौलाना हाफिज साजिद , नात मौलाना अलीम रिझवि, यांनी सादर केली तर आभार अजमल शाह यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मौलाना खलील बरककाती यांच्या दुआ ने झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाहेद सेट, अब्दुल कदीर, निसार पटेल, मोहसीन खाटीक, आसीफ ठेकेदार, अफजल ठेकेदार, फारुक ठेकेदार, मोहम्मद आसिफ, मोहम्मद शरीफ, रिजवान भाई, याकुब सर आदींनी परिश्रम घेतले