मा. अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे फळवाटप कार्यक्रम संपन्न…

24 प्राईम न्यूज 5 May 2025
महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष व पिंपरी विधानसभेचे आमदार मा. श्री. अण्णा बनसोडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागातर्फे भव्य फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे यांच्या आदेशाने व प्रदेश सरचिटणीस इर्शाद भाई जागीरदार यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. कार्यक्रमाला शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र दादा शिरसाठ, शहर जिल्हा कार्याध्यक्ष पै. रवींद्र आघाव आणि महिला जिल्हाध्यक्ष जयाताई साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कार्याध्यक्ष वंदनाताई केदार, उपाध्यक्ष गीतांजली जाधव, शहर जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्निल पोळ, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, उपाध्यक्ष दयाराम लोंढे साहेब, विशाल वानखेडे, महिला आघाडी व सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला आणि नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.