शिवसेना (शिंदे गट) अमळनेर तालुकाप्रमुखपदी सुरेश पाटील यांची नियुक्ती..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या अमळनेर तालुका प्रमुखपदी सुरेश अर्जुन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली असून, नियुक्तीपत्रावर शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे यांची सही आहे.
या वेळी पारोळा आमदार अमोल पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सहसचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख सुनील चौधरी, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विष्णू भंगाळे, महिला जिल्हा प्रमुख सारिका माळी, अमळनेर शहर प्रमुख संजय कौतिक पाटील तसेच जिल्हा व तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल राज्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सुरेश पाटील यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच माजी आमदार चिमणराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, विक्रांत पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, अमित ललवाणी, रोहित कोकटा, संजय पाटील, प्रवीण पाटील, डॉ. विजय पाटील, रिटा बाविस्कर, डॉ. प्रशांत शिंदे, ढेकू सिम सरपंच सुरेखा पाटील, हेडावे माजी सरपंच रवींद्र पाटील, रितेश बोरसे, हेमंत भांडारकर आदींनी अभिनंदन केले.