आर्मी स्कूल अमळनेरच्या १२ वीच्या परीक्षेत सागर पावरा प्रथम.

आबिद शेख/ अमळनेर

विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेर यांनी यंदाही १२ वीच्या परीक्षेत उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत सागर तुळशीराम पावरा याने ८६.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर निखिल ज्ञानेश्वर मोरे याने ८४.५०% गुणांसह द्वितीय, तर भाग्येश गोकुळ मोरे याने ८२.८३% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रा. श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, कमांडन्ट लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे, प्राचार्य व्ही. जी. बोरसे, सुभेदार मेजर नागराज पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
सागर पावरा हा आर्मी स्कूलचे हिंदी विषयाचे शिक्षक टी. के. पावरा यांचा चिरंजीव आहे.