पुलवामा हल्यातील शहिदांना शेकडो दिवे लावून श्रद्धांजलीअर्पण….

अमळनेर ( प्रतिनिधि) संपूर्ण जगात व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असताना अमळनेरात मात्र खान्देश रक्षक संघटना , आजी माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी काळा दिवस पाळून पुलवामा हल्यातील शहिदाना शेकडो दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पाचपावली मंदिरापासून १४ रोजी सायंकाळी सहा वाजता शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करून मिरवणूक त्रिकोणी बगीचा ,वड चौक , झामी चौक मार्गे तिरंगा चौकात आली. तिरंगा चौकात शहिद जवानांना दिवे लावून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राजमुद्रा ढोल पथक , पोलीस निरीक्षक विजय शिंदे , पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , खान्देश रक्षक समितीचे मनोज शिंगाणे , पूनम हटकर , महेश मराठे , चेतन पाटील ,हेमंत पाटील , चंद्रकांत पाटील , मधुकर पाटील , सचिन पाटील , कैलास शिंदे , दीपक माळी ,रवी पाटील हजर होते.