लायन्स क्लबला ९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले… जळगाव येथील कार्यक्रमात झाला सन्मान..

अमळनेर(प्रतिनिधी)
लायन्स क्लब इंटरनॅशनल विभागीय परिषद आयोजित जल्लोष २०२३ कार्यक्रमात अमळनेर लायन्स क्लब ला एकूण ९ परितोषिकांनी जळगाव येथे गौरविण्यात आले.डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ ला. पुरुषोत्तम जयपूरीया तसेच ला.अविनाश शर्मा उदघाटक होते.
यावेळी व्यासपीठावर एमजेएफ सुनील देसर्डा,गिरीश सिसोदिया,,जयेश ललवाणी,रवींद्र गांधी,उमेश सैनानी,हिना रघुवंशी,सीए.नीरज अग्रवाल उपस्थित होते.
लायन्स क्लब मार्फत जळगाव येथे १२ फेब्रुवारी रोजी विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.डिस्ट्रिक्ट ३२३४ एच-२,रिजन-२ आयोजित विभागातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.अमळनेर लायन्स क्लब ला एकूण ९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले यात लायन्स एक्स्पो च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी निधी उभारणे,माझा देश माझा स्वाभिमान उपक्रमांतर्गत आयोजित केलेली तिरंगा रॅली,सर्वोत्तम क्लब स्थापना,रिजन चे सर्वोत्तम अध्यक्ष योगेश मुंदडे (सुवर्ण),रिजन चा सर्वोत्तम क्लब(रजत),सर्वोत्तम झोन अध्यक्ष सीए. नीरज अग्रवाल(प्लॅटिनम),जीएसटी कोऑरडीनेशन, एमजेएफ विनोद अग्रवाल, एलसीआयएफ डोनेशन पारितोषिक,बेस्ट ड्रेस लायन अशा एकूण ९ पुरस्कारांनी अमळनेर लायन्स क्लब ला गौरविण्यात आले.
अमळनेर लायन्स क्लब च्या सामाजिक तसेच इतर उपक्रमांची दखल घेत जल्लोष २०२३ या कार्यक्रमात क्लब ला गौरविण्यात आले.यावेळी लायन्स प्रेसिडेंट योगेश मुंदडे, ट्रेझरर अनिल रायसोनी,झोन चेअरमन नीरज अग्रवाल,जेष्ठ सदस्य बजरंगलाल अग्रवाल,राजेश भाई शाह,प्रदीप जैन,डॉक्टर रवींद्र जैन,एमजेएफ विनोद अग्रवाल, प्रशांत सिंघवी,जितेंद्र जैन,दिलीप गांधी,डॉ.मिलिंद नवसारीकर,राजू नांढा, प्रदीप अग्रवाल,जितेंद्र कटारिया,बाळू कोठारी,प्रीतम मणियार,लालू सोनी,कमलेश भंडारी मनीष जोशी,अजय हिंदुजा,पीडीजी डॉक्टर रवींद्र कुलकर्णी व डॉक्टर मंजिरी कुलकर्णी तसेच क्लब चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.