स्पर्धा परीक्षेत यशासाठी प्रेरणा व तयारी आवश्यक – डीवायएसपी केदार बारबोलेयुवा मित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
– “आयुष्यात यश मिळवण्यासाठी स्वतःची प्रेरणा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी केले.

युवा मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप व निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. डीवायएसपी बारबोले यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी गायत्री माता मंदिर व वरणेश्वर मंदिर येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके वाटण्यात आली.
कार्यक्रमात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अनिल बडगुजर, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अभ्यासातील सातत्य, सकारात्मक विचारसरणी व योग्य प्रेरणास्थान निवडण्याचे महत्त्व विशद केले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती प्रशांत निकम, खा. शि. मंडळाचे माजी चेअरमन डॉ. अनिल शिंदे, उद्योगपती अमेय मुंदडा, माजी जिप सदस्य अॅड. व्ही. आर. पाटील, अर्बन बँकेचे व्हॉ. चेअरमन रणजित शिंदे, बाजार समिती संचालक हिरालाल पाटील, संपादक जितेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन दिनेश तेवर, यश वर्मा, आशिष अंधारे, राहुल कंजर, योगेंद्र बाविस्कर, उज्वल पाटील, तुषार सोनार, मनोज शिंगाणे, सागर विसपुते, गौरव पाटील, शुभम पाटील, वेदांत देव, पियुष जोशी, दीपक जाधव, राकेश लांडगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
स्पर्धा परीक्षा पुस्तके गायत्री माता मंदिर अभ्यास वर्ग, मिशन पोलीस भरती ग्रुप, वरणेश्वर मंदिर अभ्यास वर्ग, लक्ष करिअर अकादमी आदी गटांना वाटण्यात आली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रणजित शिंदे यांनी केले.