ब्रिटिशकालीन पितळी घणटा अजूनही रेल्वे स्टेशनवर वाजतो – ‘डिजिटल इंडिया’त इतिहासाचे जतन…


24 प्राईम न्यूज 12 May 2025
डिजिटल इंडिया अभियानामुळे भारतातील अनेक सेवा आणि यंत्रणा डिजिटल झाल्या असल्या, तरी काही ऐतिहासिक वस्तू आजही आपल्या मूळ स्वरूपात टिकून आहेत. त्यापैकी एक म्हणजे रेल्वे स्टेशनवरील पितळी घणटा, जी ब्रिटिश कालखंडात वापरात आणण्यात आली होती.

ही घणटा मुख्यत्वे गाड्यांच्या आगमन व प्रस्थानाची सूचना देण्यासाठी वाजवली जात असे. आज एलईडी बोर्ड, अनाउन्समेंट सिस्टिम्स आणि मोबाइल अॅप्सच्या युगात असतानाही ही घणटा अनेक रेल्वे स्थानकांवर अद्याप कार्यरत आहे. ती केवळ वेळ सांगणारी साधन नसून रेल्वेच्या शिस्तीचा आणि पारंपरिक व्यवस्थेचा प्रतीक ठरली आहे.
या घंंटेचा आवाज अनेक प्रवाशांसाठी आठवणींना उजाळा देणारा असतो. रेल्वे प्रशासनाकडूनही अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करून त्यांना आधुनिकतेसोबत जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.