जळगाव, धुळे, नंदुरबारसह १४ जिल्ह्यांत यलो अलर्ट; पुढील काही दिवस बेमोसमी पावसाची शक्यता..

24 प्राईम न्यूज 12 May 2025
| हवामान विभागाकडून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह राज्यातील १४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
शनिवारी आणि रविवारी ढगाळ वातावरण होते, आणि काही भागांत हलक्या सरीही झाल्या. त्यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे. येत्या २० व २१ मे रोजी पुन्हा बेमोसमी पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

त्याचबरोबर १४ ते १९ मे या कालावधीतही काही भागांत पावसाची शक्यता असून, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील उरलेली पीक वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या पावसात वादळी वाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.