भुसावळमध्ये “राष्ट्रप्रथम “१५ दिवसांचे रक्तदान अभियानाचे उद्घाटन..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-
22 Ct सोने 91.60% : ₹. 90050/-
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 990/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
– जिल्ह्यात पोहोचलेल्या “राष्ट्रप्रथम” या संकल्पनेअंतर्गत १५ दिवस चालणार्या विशेष रक्तदान शिबिरांचे शनिवारी भुसावळ येथील विभागीय रेल्वे रुग्णालयातून शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले तर रक्तदान करून जनतेस रक्तदानासाठी प्रेरित करण्याची पहल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली.

उद्घाटन समारंभात बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “सीमेवरील शौर्यवान जवान आणि अंतर्गत भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रक्तदान हा आपला राष्ट्रीय कर्तव्य आहे. या अभियानातून संकलित रक्ताच्या पिशव्यांचा ५०% वीर सैनिकांसाठी तर उर्वरित जिल्ह्यातील आपत्कालीन गरजूंना दिला जाणार आहे.” त्यांनी स्वतःही मान्यतेने रक्तदान करत इतरांना कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनाच्या योजना रूजविण्यासाठी आणि रक्तदानाच्या या जनकल्याणकारी उपक्रमाला पुढे नेण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करण्याची घोषणा या वेळी पुन्हा एकदा केली. “रक्तदान हा मानवतेचा सर्वोच्च दान आहे,” असे ते म्हणाले.
उद्घाटन समारंभात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, तालुका अधिकारी आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था तसेच अनेक स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या अभियानात सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असून आगामी १५ दिवसांत रक्तदानाचे शिबिरे भुसावळसह खेडेगावातही सुरू राहणार आहेत.

निमित्त येणा-या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत